Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive : आदित्य ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला तर?... 'हे' आहे नितेश राणेंचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 19:39 IST

भविष्यात आदित्य ठाकरे यांनी तुमच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला तर काय कराल या प्रश्नाला उत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी हे मतं मांडले. 

मुंबई -  भविष्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला तर मैत्री ते कशासाठी करु पाहतायेत याचं कारण समजून घेऊन त्यावर विचार करुन हात पुढे करु असं मतं काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी मांडले आहे. लोकमत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी नितेश राणे यांच्याशी संवाद साधला. यावेळी संवादामध्ये नितेश राणे यांनी दिलखुलासपणे सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. राजकारणात विविध पक्षात आपली मित्रमंडळी आहेत त्यामुळे भविष्यात आदित्य ठाकरे यांनी तुमच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला तर काय कराल या प्रश्नाला उत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी हे मतं मांडले. 

तसेच मागील काही दिवसांपासून इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीत तरुण नेतृत्त्व पक्षप्रवेश करत आहेत त्यावरही नितेश राणेंनी भाष्य करत रणजितसिंह मोहिते पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचे समर्थन केले. जनतेला कामे झालेली हवी असतात, जनतेच्या प्रश्नांना आमदार-खासदारांना उत्तरे द्यावी लागतात, जनतेच्या हितासाठी कोणता निर्णय घ्यायचा असेल तर त्या लोकप्रतिनिधीला घ्यावी लागतात, मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी निधी लागतो. जनतेला त्यांची कामे झालेली बघायची असतात त्यामुळे रणजितसिंह पाटील यांनी कालच्या भाषणात जनतेसमोर जे मुद्दे मांडले ते योग्य होते. जनतेला विचारुनच त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना नितेश राणेंनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुजय विखे पाटील गेली  दोन-तीन वर्षे मतदारसंघात बांधणी करत आहे. काँग्रेसकडून तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होते. मात्रकाँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही, मग सुजय विखे यांनी खासदार संधी का सोडावी असा प्रश्न उपस्थित होता.  पक्ष वाढविण्याच्या दृष्टीकोनातून काँग्रेस नेतृत्वाकडून प्रयत्न होणं गरजेचे होतं. सुजय यांना काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवून देणं काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांचे काम होते. नारायण राणे काँग्रेस कमिटीत असते तर सुजय विखेंनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली असती हे ठामपणे सांगतो. विरोधी पक्षनेत्याच्या मुलाला तिकीट मिळत नसेल तर हा काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्त्वाचे मोठं अपयश आहे असा आरोपही नितेश राणेंनी यावेळी बोलताना केला. 

(Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम')

(Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण)

(Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा)

पहा व्हिडीओ

टॅग्स :लोकसभा निवडणूकनिवडणूकनीतेश राणे सुजय विखेआदित्य ठाकरे