नऊ वर्षांपूर्वी १६ वर्षांच्या मुलीला दिला होता फ्लाईंग किस, आता कोर्टाने आरोपी तरुणाला सुनावली अशी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:39 IST2026-02-19T15:38:28+5:302026-02-19T15:39:01+5:30
Mumbai Crime News: नऊ वर्षांपूर्वी एक १६ वर्षांच्या मुलीला फ्लाईंग किस दिल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने एका तरुणाला दोषी ठरवलं असून, त्यााला ३ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि ३ हजार रुपये शिक्षा सुनावली आहे.

नऊ वर्षांपूर्वी १६ वर्षांच्या मुलीला दिला होता फ्लाईंग किस, आता कोर्टाने आरोपी तरुणाला सुनावली अशी शिक्षा
नऊ वर्षांपूर्वी एक १६ वर्षांच्या मुलीला फ्लाईंग किस दिल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने एका तरुणाला दोषी ठरवलं असून, त्यााला ३ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि ३ हजार रुपये शिक्षा सुनावली आहे. ही घटना घडली तेव्हा आरोपी तरुण १९ वर्षांचा होता, तर पीडित मुलगी १६ वर्षांची होती. दरम्यान, दीर्घकाळ खटला चालून निकाल लागेपर्यंतच्या कालावधीत आरोपीचं लग्नही झालं असून, त्याला आता ३ वर्षांचा मुलगा आहे.
ही घटना ३१ जानेवारी २०१७ रोजी घडली होती. गल्लील हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू असताना आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीकडे पाहून फ्लाईंग किस दिला होता. ही बाब शेजारी राहणाऱ्या एका महिलेने पाहिली होती. जेव्हा या पीडित मुलीच्या आईने तिला याबाबत विचारले तेव्हा तिने सदर आरोपी मुलाने काही दिवसांपूर्वी क्लासला जात असताना पाठलाग केला होता. तसेच हात पकडून आपल्याकडे खेचले होते, असे सांगितले. मात्र घाबरल्यामुळे आपण घरात काही सांगितले नाही, असे ती मुलगी म्हणाली होती.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी २०१७ च्या मध्यावर आरोपी आणि त्याच्या आईला बोलावले आणि मुलीपासून दूर राहण्यास सांगितले. मात्र आरोपीच्या कुटुंबीयांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. तसेच त्यावरून गुन्हा दाखल होऊन कोर्टात खटला उभा राहिला.
या प्रकरणी सुनावणी सुरू असताना आरोपीच्या वकिलांनी आरोपी डान्सच्या स्टेप करत असताना त्याने डान्स स्टेप म्हणून फ्लाईंग किस केल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. मात्र पीडित मुलीने हा दावा फेटाळून लावला. तसेच कोर्टाने या युक्तिवादामधून आरोपीने केलेल्या गुन्ह्याची अप्रत्यक्षरीत्या कबुली देण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यानंतर न्यायमूर्तींनी आरोपीला दोषी ठरवून त्याला ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.