Join us

"ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते, हे राज्य कुणाच्या बापाचे नाही" निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 11:10 IST

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे विधान संजय राऊत यांनी केले होते.

ठळक मुद्देजगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं. हे राज्य कुणाच्या बापाचं नाहीहे राज्य जनतेने मोठं केलं आहे. कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही

मुंबई - ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.संजय राऊत यांनी कंगना आणि शिवसेना वाद तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे कुटंबाच्या महत्त्वाबाबत सामनामधून लिहिलेल्या रोखठोक लेखाला निलेश राणे यांनी ट्वटिवरवरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, संजय राऊत म्हणतात की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. त्यांना सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते. म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचं का? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं. हे राज्य कुणाच्या बापाचं नाही. हे राज्य जनतेने मोठं केलं आहे. कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.

दरम्यान, निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतांसारखा भंगार माणूस कुणी नाही. कारण परिस्थिती अंगावर आली हे लक्षात आलं की, फक्त मराठी अमराठी वाद लावून द्यायचा की लोग आपोआप स्वत:ला वाटून घेतात आणि शिवसेनेचं काम सोपं होतं. मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी आणि संधी मिळताच यांना आडवं करावं. 

 सामनामधील रोखठोक लेखात काय म्हणाले होते राऊतठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल.महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ

देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईसा पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच म्हटले पाहिजे

टॅग्स :निलेश राणे संजय राऊतशिवसेनाभाजपाराजकारण