Join us

BREAKING: 'डी-कंपनी'वर NIA ची मोठी कारवाई, मुंबईत दाऊदच्या शार्प शूटर्सशी निगडीत २० ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 08:31 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मोठी कारवाई केली आहे. मुंबईत आज जवळपास २० ठिकाणांवर एनआयएनं छापेमारी केली आहे.

मुंबई-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मोठी कारवाई केली आहे. मुंबईत आज जवळपास २० ठिकाणांवर एनआयएनं छापेमारी केली आहे. ही सर्व ठिकाणं दाऊदचे शार्प शूटर्स, ड्रग्ज पेडलर्स यांच्याशी निगडीत असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय दाऊदच्या हवाला ऑपरेटर्सवरही कारवाई करण्यात आली आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दाऊदशी निगडीत मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर काही ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली आहे. अनेक हवाला ऑपरेटर्स आणि ड्रग्ज पेडलर दाऊदशी संबंधित असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. फेब्रुवारीमध्या या संदर्भात नोंद घेण्यात आली होती. आजपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे, असंही एनआयएकडून सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :दाऊद इब्राहिमराष्ट्रीय तपास यंत्रणापाकिस्तान