Sachin Vaze: सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात? एनआयएकडून चौकशी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 09:36 AM2021-03-11T09:36:17+5:302021-03-11T09:38:51+5:30

nia to question police officer sachin vaze: महाराष्ट्र एटीएसनंतर आता एनआयए वाझेंची चौकशी करण्याची शक्यता

nia to question police officer sachin vaze in mukesh ambani security scare | Sachin Vaze: सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात? एनआयएकडून चौकशी होण्याची शक्यता

Sachin Vaze: सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात? एनआयएकडून चौकशी होण्याची शक्यता

Next

मुंबई: व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांनी वाझेंवर अतिशय गंभीर आरोप केले. ठाकरे सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर आता वाझेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानंतर (एटीएस) आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे.

'सुपरकॉप' असण्याची बेदरकार नशा...अन् सचिन वाझे!

महाराष्ट्र एटीएसनं सचिन वाझेंची एकदा चौकशी केली आहे. त्यानंतर एटीएसच्या पथकानं हिरेन यांच्या पत्नीची चौकशी केली. हिरेन यांच्या पत्नीनं चौकशीदरम्यान वाझेंवर अतिशय गंभीर आरोप केले. त्यामुळे या संदर्भात एटीएस पुन्हा एकदा वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. याशिवाय एनआयएदेखील वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

ही गाडी कुणाची?... सचिन वाझेंचा पाठलाग करणारी कार सापडली, नवं वळण लागणार?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिननं भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास वाझे करत होते. त्या प्रकरणात एनआयएकडून आज किंवा उद्या वाझेंची चौकशी केली जाऊ शकते. गृहमंत्री अनिल देशमुखांनी कालच विधिमंडळात वाझेंची गुन्हे शाखेतून बदली करत असल्याची घोषणा केली. यानंतर आता वाझेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
सचिन वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का? एका आरोपीला उचलून आणले म्हणून त्याला लटकवताय का? चौकशीत काय ते सत्य बाहेर येईलच पण ‘आधी फाशी अन् मग चौकशी’ ही कोणती नवी पद्धत आणली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. कॉल रेकॉर्ड, सीडीआरवरुन लगेच कुणाला फाशी देण्याची भूमिका घ्यायची का? असे असेल तर मग पोलीस पाहिजेतच कशाला? त्यांनीच तपास करावा असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण आम्ही गांभीर्यानेच घेतले आहे. पण उगाच कुणाला टार्गेट करायचं, अब्रूचे धिंडवडे काढायचे अन् मग तपासात निर्दोष आढळल्यावर काय करणार असा सवालही ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे हेच वाझेंचे वकील; फडणवीसांचा घणाघात
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार आज आम्हाला पाहायला मिळालं. ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच सचिन वाझेंवरून देखील जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला.

Read in English

Web Title: nia to question police officer sachin vaze in mukesh ambani security scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.