‘जा... सिमरन जा..., बाबूमोशाय, मत भाग मिल्खा’, रेल्वे प्रशासनाचे नवीन ब्रीदवाक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:41 AM2019-09-30T03:41:20+5:302019-09-30T03:42:14+5:30

‘जा सिमरन जा.’ हा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आजच्या पिढीला ज्ञात आहे. हा संवाद सध्या रेल्वे प्रशासनाचे ब्रीदवाक्य बनले आहे.

New slogan of the railway administration | ‘जा... सिमरन जा..., बाबूमोशाय, मत भाग मिल्खा’, रेल्वे प्रशासनाचे नवीन ब्रीदवाक्य

‘जा... सिमरन जा..., बाबूमोशाय, मत भाग मिल्खा’, रेल्वे प्रशासनाचे नवीन ब्रीदवाक्य

Next

- कुलदीप घायवट 
मुंबई : ‘जा सिमरन जा़़़’ हा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आजच्या पिढीला ज्ञात आहे़ हा संवाद सध्या रेल्वे प्रशासनाचे ब्रीदवाक्य बनले आहे़ विशेष म्हणजे हे ब्रीदवाक्य आहे स्वच्छतेसाठी़ रेल्वे प्रवाशांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी चित्रपटातील गाजलेले संवाद भित्तीचित्राद्वारे फलाटावर लावून रेल्वे प्रशासन जनजागृती करत आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, लोणावळा, कर्जत रेल्वे स्थानकांवर हे संवाद दर्शनी भागात लावलेले आहेत़ ‘जा सिमरन जा’प्रमाणे ‘आनंद’ चित्रपटातील ‘बाबूमोशाय ... कब, कौन, कहां, कुडा फेंकेगा यह कोई नहीं बता सकता’, ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटातील ‘कचरा मत फेंको यारो’ हा संवाद, ‘शोले’ चित्रपटातील ‘अरे ओ सांबा... कितना जुर्माना रखे है सरकार गंदगी फैकने पर... ५०० रुपये... पुरे ५००’ हे संवाद भित्तीचित्राद्वारे फलाटावर लावण्यात आले आहेत़ यासह इतर चित्रपटांतील गाजलेले व आठवणीतील संवाद रेल्वे स्थानकांवर चिटकविण्यात आले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा नारा दिल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या सर्वच विभागांनी स्वच्छतेसाठी उपक्रम हाती घेतले़ मंत्री, अभिनेत्यांनी हातात झाडू घेतली़ काही विभागांनी स्वच्छतेसाठी विशेष कार्यक्रम घेतले़ याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध संवादांद्वारे जनजागृती सुरू केली आहे़ संवादांचे हे प्रतीक प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे़ याला प्रवाशांची दादही मिळत आहे़

मध्य रेल्वे मार्गावर स्वच्छता मोहीम सुरू आहे. प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी विविध कल्पना आखल्या आहेत़ यातून चित्रपटांच्या प्रसिद्ध संवादांद्वारे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्याची कल्पना काही अधिकाऱ्यांना सुचली. नागरिकांकडून चित्रपटाच्या संवादाचे अनुकरण केले जाते. याच पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे धडे देणाºया संवादाचा वापर केला आहे. नागरिकांना स्वच्छतेबाबत जागृत करण्यासाठी याचा उपयोग होईल.
- शिवाजी सुतार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे


काही प्रवासी धावती गाडी पकडतात, अशा प्रवाशांना रोखण्यास चित्रपटांतील डायलॉगचा वापर केला आहे. ‘ना सिमरन ना... भाग कर कभी ट्रेन में न चढना, ये जानलेवा हो सकता है’, ‘मत भाग मिल्खा, अगली ट्रेन आयेगी’ असे प्रवाशांमध्ये जागरूकता आणणारे फलक मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकावर लावले आहेत.

Web Title: New slogan of the railway administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.