Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:53 IST

आधी ६ एप्रिलची वेळ देण्यात आली होती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बहुप्रतीक्षित मंडाळे ते डी. एन. नगर मेट्रो २ बी आणि दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ या मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आली आहे. राज्य सरकारने नव्याने ७ एप्रिलची वेळ दिल्याने हे लोकार्पण लांबणीवर पडले.

मेट्रो २ बीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन पाच महिने, तर मेट्रो ९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन अडीच महिने उलटले आहेत. एमएमआरडीएने त्यांच्या लोकार्पणाची तयारी पूर्ण केली आहे. मात्र राज्य सरकारने निवडणुकांमुळे त्यांच्या लोकार्पणासाठी वेळ दिली नव्हती. त्यातून हे लोकार्पण लांबणीवर पडले होते. यापूर्वी ३ एप्रिलला हा सोहळा होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यात बदल करून ६ एप्रिलची वेळ देण्यात आली होती. आता पुन्हा मंगळवारी, ७ एप्रिलला लोकार्पण करण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर या दोन नव्या मेट्रो सेवेत दाखल होतील.  

दोन्ही मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणासह ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या भुयारीकरणाचा शुभारंभ आणि बीकेसीतील पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही आता ७ एप्रिलला करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात मेट्रो ९च्या या स्थानकांवर मेट्रो धावणार: दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशीगाव

पहिल्या टप्प्यात मेट्रो २ बीच्या या स्थानकांवर मेट्रो धावणार: मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन.

English
हिंदी सारांश
Web Title : Metro 2B, 9 Launch Delayed Again; Service Starts Tuesday

Web Summary : The launch of Metro 2B and 9's first phases is postponed again, now slated for Tuesday, April 7th. The delay, attributed to state government scheduling, also includes the Thane-Borivali tunnel and BKC pod taxi project launch.
टॅग्स :मेट्रोमुंबईएमएमआरडीए