संघ विचारांच्या कुलगुरूंना हाकलण्यावरून राज्यात नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:06+5:302020-01-10T06:00:13+5:30

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्यातील विविध कृषी, बिगरकृषी विद्यापीठांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि निबंधक नेमण्यात आले.

New controversy in the state over the removal of the Vice-Chancellor of the Union | संघ विचारांच्या कुलगुरूंना हाकलण्यावरून राज्यात नवा वाद

संघ विचारांच्या कुलगुरूंना हाकलण्यावरून राज्यात नवा वाद

Next

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्यातील विविध कृषी, बिगरकृषी विद्यापीठांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे कुलगुरू,
प्र-कुलगुरू आणि निबंधक नेमण्यात आले. त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी आमदार आशिष देशमुख यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जेएनयूमध्ये हिंसाचार घडला. तेथील कुलगुरू हे संघविचारांचे आहेत. त्यामुळे अप्रवृत्तींना उत्तेजन मिळाले असण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये उद्या असे प्रकार घडू शकतात. अशावेळी तेथे संघविचारांचे कुलगुरू असले तर असामाजिक प्रवृत्तींना अभय दिले जाऊ शकते असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
माजी शिक्षण मंत्री व भाजपचे नेते विनोद तावडे आणि आशिष शेलार यांनी या मागणीचा चांगलाच समाचार घेतला. देशमुख यांनी विद्यापीठ कायदाच वाचलेला नाही. गेल्या पाच वर्षांत झालेल्या कुलगुरू नियुक्त्यांमध्ये फडणवीस वा आमचा कोणताही हस्तक्षेप नव्हता. कुलगुरूंच्या निवडीची एक प्रक्रिया असते आणि निवड ही योग्यतेनुसारच केली जाते, असे ते म्हणाले.
अशासकीय नियुक्त्या रद्द
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केलेल्या समित्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
यांनी विभागाच्या आढावा बैठकीत सांगितले. नवीन सदस्यांची
नियुक्ती करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ग्रंथालयाची नव्याने पडताळणी करणे आवश्यक असून विभागांतर्गत असलेल्या राज्यातील ग्रंथालयाची पडताळणी करुन अत्याधुनिक सुविधासह ग्रंथालये असावेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालय, विद्यापीठे यांच्या रिकाम्या जागेवर अतिक्रमण झाले आहे ते तातडीने हटविण्याची कार्यवाही करावी आणि या जागेचा उपयोग करावा, असे निर्देशही सामंत यांनी दिले.

Web Title: New controversy in the state over the removal of the Vice-Chancellor of the Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.