जे गेले त्यांची पर्वा करू नका; मुंबई तुमच्याच जीवावर जिंकणार- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 06:22 IST2022-08-13T06:22:38+5:302022-08-13T06:22:51+5:30

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन

Never mind those who are gone; Mumbai will win on your own life- Uddhav Thackeray | जे गेले त्यांची पर्वा करू नका; मुंबई तुमच्याच जीवावर जिंकणार- उद्धव ठाकरे

जे गेले त्यांची पर्वा करू नका; मुंबई तुमच्याच जीवावर जिंकणार- उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्यासोबत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना काम करत रहा, वॉर्डमध्ये फिरा असा संदेश यावेळी दिला. लोकांसाठी, लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, त्यामुळे लोकांची कामे करा, मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना जिंकणारच, असा आत्मविश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.   
जे गेले त्यांचा विचार करू नका, मुंबई तुमच्याच जीवावर जिंकणार, असे सांगत या माजी नगरसेवकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत बोलताना कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी माजी नगरसेवकांना केले.   

बैठकीला १३ माजी  नगरसेवक गैरहजर  

उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या या बैठकीला शिवसेनेचे १३ माजी नगरसेवक गैरहजर होते. मुंबईतील काही नगरसेवक एकनाथ शिंदे गटाबरोबर आहेत. मात्र या बैठकीचा निरोप काल दुपारनंतर दिला होता. त्यामुळे काही माजी नगरसेवक बैठकीला येऊ शकले नाहीत. जे गैरहजर होते त्यांनी त्याचे कारण पक्षाला कळवले असल्याची माहिती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे

Web Title: Never mind those who are gone; Mumbai will win on your own life- Uddhav Thackeray