Join us  

'संपूर्ण देश भाजपासोबत', प्रविण तरडेंच्या कमेंटवर नेटीझन्स संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 9:03 AM

जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना हल्ला केला होता.

मुंबई - मूळशी पॅटर्नफेम अभिनेता प्रविण तरडे पुन्हा एकदा नेटीझन्सच्या निशाण्यावर आले आहेत. भाजपा समर्थनाच्या कमेंटवरुन प्रविण तरडेंना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. तरडे नेहमीच विविध मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करताना भाजपाचे समर्थन करतात. यापूर्वी आरेतील वृक्षतोडीचं समर्थन करत त्याने सहकारी कलाकारांवर निशाणा साधला होता. सध्या, जेएनयुत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशपातळीवर संतापाच वातावरण आहे, त्यात त्यांनी कमेंट करून स्वत:ला टीकेचं धनी करून घेतलंय.  

जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना हल्ला केला होता. त्यामुळे, देशभरात विद्यार्थी संघटनांनी एकत्र त्याचा निषेध नोंदवत आंदोलन केलं. या आंदोलनात अनेक सिनेकलाकार सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वांनीच या घटनेचा निषेध नोंदवला. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही जेएनयुतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. देशभरात जेएनयुचा मुद्दा गाजत असताना, प्रविण तरडेंनी एका फेसबुक पोस्टवर कमेंट करताना, संपूर्ण देश भाजपासोबत आहे, असे म्हटले. त्यामुळे, नेटीझन्सने तरडेंना ट्रोल केलंय. 

पत्रकार राजू परुळेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये, ''एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा.'' अशी पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. त्यांच्या या पोस्टवर अभिनेता प्रविण तरडेंनी कमेंट करताना, 'संपूर्ण देश भाजपासोबत' असे म्हटले. तरडेंच्या कमेंटवरुन नेटीझन्सने त्यांना चांगलच ट्रोल केलंय. विशेष म्हणजे जवळपास 2 हजार जणांनी तरडेंना कमेंटमधून उत्तर दिलंय. त्यामध्ये तरडेंच्या कमेंटचा समाचार घेतलेल्याच कमेंट सर्वाधिक आहेत.

 दरम्यान, यापूर्वी प्रविण तरडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. तरडेंनी आरेतील वृक्षतोडीचे समर्थन करत विरोध करणाऱ्यांना टोला लगावला होता. तसेच, ''पुण्यातून मुंबईत राहायला गेलेले बरेच नाटक सिनेमावाले म्हणतायेत झाडे का कापतायेत? मग काय तुम्ही घेतलेली घरे पाडून मेट्रो करायची का ? वाढलेली गर्दी जबाबदार आहे'' असे म्हणत प्रविण तरडेंनी मेट्रो कारशेडसाठी पाडण्यात येणाऱ्या झाडांचे समर्थन केले होते. 

टॅग्स :प्रवीण तरडेजेएनयूसोशल मीडियाफेसबुक