Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नीट' परीक्षेवर गैरप्रकाराच्या संशयाचे ढग; एनटीएने तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:12 IST

NEET Exam Update: नीट यूजी परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) हे प्रकरण चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपविले आहे.

मुंबई : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'नीट यूजी' परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत नीट यूजी परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) हे प्रकरण चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपविले आहे. या यंत्रणांच्या माहितीच्या आधारावर राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन पथकाने (एसओजी) चौकशी सुरू केली आहे.

देशभरात नीट यूजी परीक्षा ३ मे रोजी पार पडली. त्यानंतर ७ मे रोजी सायंकाळी एनटीएला या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची काही माहिती मिळाली. एनटीएने ८ मे रोजी ही माहिती पुढील तपासासाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपविली. त्यानंतर तपास यंत्रणांनी काहींना ताब्यात घेतल्याचे एनटीएने म्हटले आहे.

याबाबत राजस्थानमध्ये खासगी क्लासेसमधील सराव परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न एनटीए परीक्षेत विचारण्यात आले होते. त्यातून पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर या प्रकरणात यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात एनटीएने रविवारी पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये तपासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

तपास यंत्रणांना सर्व तांत्रिक डेटा आणि माहिती

या प्रकरणाचा तपास राजस्थान आणि उत्तराखंड येथे सुरु आहे. तसेच त्याची व्याप्ती अन्य राज्यातही पसरल्याची चर्चा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे.

महाराष्ट्रातही काही खासगी क्लासेसच्या ग्रुपवर नीट परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न सराव परीक्षेत घेण्यात आल्याचा दावा पालक आणि विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. त्यातून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रविवारी एनटीएने प्रसिद्धी 3 पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच तपास यंत्रणांना सर्व तांत्रिक डेटा आणि माहिती देण्यात आली असून तपासात पूर्ण सहकार्य केले जात आहे, असे एनटीएने म्हटले आहे.

टॅग्स :नीट परीक्षा पेपर लीकपरीक्षाशिक्षण