Join us

दरवाजावर आलेली हुकूमशाही उंबरठ्यावरच रोखण्याची गरज: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 05:58 IST

धर्मगुरू आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): आता आपण पुन्हा चूक केली तर हुकूमशाही येईल, अशी भीती व्यक्त करत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी दरवाजावर आलेली हुकूमशाही उंबरठ्यावरच रोखण्याची गरज आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

कुर्ला येथील स्वान मिल मैदानावर श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, तेरापंथ युवक परिषद, श्री जैन तेरापंथ ट्रस्ट, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाश्रमण समवसरण आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन केले आहे.  

आपण प्रवचनाला हजेरी लावली म्हणून सगळेजण असा विचार करत असतील की आता निवडणूक जवळ आली आहे तर हे मत मागण्यासाठी आले असणार. पण मी आज येथे धर्मगुरू आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :उद्धव ठाकरे