Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गरज पडली की सल्ला अन् निवडणुकीत हल्ला' - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 06:35 IST

सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली होती.

पुणे : गरज पडली की साहेबांचा सल्ला घ्यायचा, बारामतीत येऊन कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की मग विचारायचं, साहेबांनी काय केलं? हे डबल ढोलकी राजकारण आता बास झालं, असा टोला रोहित पवार यांनी भाजपाला लगावला आहे.

सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली होती. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे भाजपावर टीका केली. शरद पवारांचे राजकारण म्हणजे कुणीही उठावे आणि बोट दाखवावे असे नाही. मध्यंतरी पीठ बदलण्याची भाषा आपण केली. जाड भरडं पीठ पण दुसऱ्या पक्षात गेलं. आता जमीन नांगरायची वेळ आलीय. चांगली मशागत करून ठेवूया, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :शरद पवारअमित शहाराष्ट्रवादी काँग्रेस