Join us

१०० व्या नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 04:31 IST

१०० वे नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून या कालावधीत पार पडणार आहे.

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद खासदार शरद पवार यांनी स्वीकारले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची त्यांना विनंती केली. या विनंतीला मान देऊन शरद पवार यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारले आहे.

१०० वे नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून या कालावधीत पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन सांगली येथे होणार असून, मुंबई येथे समारोप होईल.१०० व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची याआधीच निवड झाली आहे.

टॅग्स :शरद पवारमुंबईमहाराष्ट्रमराठी नाट्य संमेलन