Join us  

राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 11:14 AM

लोकसभा 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 26 जागांवर तर राष्ट्रवादीने 22 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी, राष्ट्रवादीला 4 जागांवर तर काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळाला.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून फिफ्टी-50 फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. शुकवारी रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीकडून हा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवण्यात आला. त्यानुसार, राज्यातील 48 जागांपैकी 24 जागांवर राष्ट्रवादीने आपला दावा केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 50-50 असाच प्रस्ताव काँग्रेसला दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच, आता आम्ही काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहत असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.

लोकसभा 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 26 जागांवर तर राष्ट्रवादीने 22 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी, राष्ट्रवादीला 4 जागांवर तर काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणूनच, राष्ट्रवादीने यंदा फिफ्टी-50 फॉर्म्युला निश्चित केला आहे. जिंकणे हाच निकष ठेवून आघाडीच्या जागा वाटपाचे जवळपास निश्चित झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसकडून याबाबत याच महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम निर्णय येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातही महाराष्ट्रातील जागावाटपावरुन चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशरद पवारराहुल गांधीजयंत पाटील