Join us  

'मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं राज ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 3:18 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्क घातला नाही. मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नाही.

मुंबई: कोरोना काळात लोकांनी मास्क घालावे म्हणून प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येते. परंतु मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्क घातला नाही. मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नाही. अनेकदा कृष्णकुंजवर लोकांनी गर्दी केली तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. तसेच दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावेळी देखील विना मास्क उपस्थिती लावली.

अलीकडेच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला शिवाजी महाराज पार्क येथे मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं होतं. इतकचं नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. 

शिवाजी पार्कात मनसेने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाच्या दरम्यान  राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतो, असं उत्तर दिलं होतं. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. 

राज ठाकरेंवर टीका न करता एक चाहता आणि प्रशंसकाच्या रुपात काळजीपोटी विनंती करत असल्याचं क्लाईड क्रास्टो म्हटलं आहे. भल्याही आपल्या राजकीय विचारधारा सारख्या नसतील, पण तुमच्या भाषण कौशल्यामुळे आणि व्यंग्य चित्रमुळे मी तुमच्याशी जोडला गेल्याचंही क्लाईड क्रास्टो यांनी सांगितंलं आहे.

खरंतर देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शिवाय देशातील निम्मे कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आणि केरळ या राज्यात आढळत आहेत. देशात अशी स्थिती असताना, राज ठाकरे यांनी सार्वजानिक ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करणं, सार्वजानिक हित्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. कारण राज ठाकरेंचे लाखों चाहते, कार्यकर्ते त्यांना डोळे झाकून फॉलो करतात. अशा परिस्थित राज ठाकरे यांनी 'मी मास्क घालतचं नाही' असं म्हणणं सार्वजानिक आरोग्यासाठी हितावह नाही आहे, असं क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस