Join us  

राष्‍ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का, अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 3:03 PM

राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या रायगड जिल्‍हयात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का बसण्याची शक्यता आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर-धक्के बसत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि आमदार एकापाठोपाठ शिवसेना किंवा भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. 

राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या रायगड जिल्‍हयात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. अवधूत तटकरे यांनी गुरुवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत अनिल तटकरे सुद्धा उपस्थित होते. 

दरम्यान, अवधूत तटकरे यांनी याआधी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूच त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. पण, त्यांनी येत्या दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत. 

काका-पुतण्यांमध्ये वाद? सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद असल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांनी आमदारकीवर दावा केला होता. तेव्हापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे समजते. त्यातच सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत तटकरे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

सुनील तटकरेंचे निकटवर्तीय रघुवीर देशमुख शिवसेनेतगेल्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्‍ट्रवादी काँगेसचे जिल्‍हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवबंधन बांधून त्‍यांचे शिवसेनेत स्‍वागत केले. विकास हवा असेल तर शिवसेना-भाजप युतीशिवाय पर्याय नसल्‍याचे पक्ष प्रवेशानंतर रघुवीर देशमुख म्‍हणाले होते. 

गेल्या निवडणुकीत निसटता विजयगेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता. या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली आहेत. 

महत्वाच्या बातम्या...

‘मनसे’ विधानसभा निवडणूक लढणार; पण स्वबळावर की आघाडीसोबत?

शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, स्वपक्षीयांमुळेच होणार कोंडी

होय, उद्धव ठाकरे अन् माझी 15 वर्षांनंतर भेट झाली, भास्कर जाधवांना 'कबूल' 

''भाजपकडे वॉशिंग मशीन; डागाळलेल्यांना गुजरातच्या निरमा पावडरने धुतो''

टॅग्स :शिवसेनासुनील तटकरेउद्धव ठाकरेरायगड