‘राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी,’ जयंत पाटलांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 10:27 AM2022-07-30T10:27:15+5:302022-07-30T10:27:33+5:30

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. 

ncp leader jayant patil targets governor bhagatsingh koshyari over his statment gujrati rajasthani people mumbai financial hub | ‘राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी,’ जयंत पाटलांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार

‘राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी,’ जयंत पाटलांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार

Next

"परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. 

"घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे," असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यपालांवर टीकेचा बाण सोडला.


महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपाला हे विधान मान्य आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे. राज्यपाल मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार का अपमान करत आहेत ? असा सवालही त्यांनी केला.

काय म्हणाले होते राज्यपाल?
“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असं कोश्यारी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

Web Title: ncp leader jayant patil targets governor bhagatsingh koshyari over his statment gujrati rajasthani people mumbai financial hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.