पोटदुखीचा त्रास बळावल्यानं शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:01 PM2021-03-30T18:01:04+5:302021-03-30T18:04:15+5:30

ncp chief sharad pawar unwell admitted in breach candy hospital: शरद पवार यांच्यावर आजच शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

ncp chief sharad pawar unwell admitted in breach candy hospital | पोटदुखीचा त्रास बळावल्यानं शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

पोटदुखीचा त्रास बळावल्यानं शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Next

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उद्या (बुधवारी) एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्यांचा पोटदुखीचा त्रास बळावल्यानं आजच त्यांना ब्रीच कँडीत दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. (ncp chief sharad pawar unwell admitted in breach candy hospital)

“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

आज संध्याकाळी शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या. तत्पूर्वी आज दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर आज पवार रुग्णालयात ऍडमिट झाले आहेत. पोटदुखीचा त्रास वाढल्यानं त्यांच्यावरच आजच शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.

"पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, फुरसत मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या"

शस्त्रक्रियेनंतर पवारांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचं समजतं.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी दुपारी पवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. काल पवारांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र आज अचानक त्रास सुरू झाल्यानं पवार रुग्णालयात ऍडमिट झाले.

एण्डोस्कोपी केव्हा करावी लागते?
विशिष्ट आजाराचे निदान करण्यासाठी
काही उपचारांसाठी
शस्त्रक्रियेसाठी (Endoscopic वा Laproscopic सर्जरीसाठी)

एण्डोस्कोपी काय असते?
एण्डोस्कोपी पोटात लहानसे छ‌िद्र करुन त्यातून दुर्बिण (एण्डोस्कोपी) आत टाकली जाते. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड (CO2) या वायूने रुग्णांचे पोट फुगवले जाते. त्यानंतर पोटाच्या आतील भागाचे निरिक्षण केले जाते. समस्या नेमकी काय आहे ते कळल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास नाभी व्यतिरिक्त दोन-तीन ठिकाणी छ‌िद्र तयार करून उपकरणं पोटात सोडली जातात आणि शस्त्रक्रिया केली जाते.

एण्डोस्कोपीचा फायदा
एण्डोस्कोपी पद्धतीच्या ऑपरेशनमध्ये २ ते ३ छिद्रांमधून ऑपरेशन करण्यात येतं. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात. पोटावर शस्त्रक्रियेचा डाग राहत नसून रुग्णाला दवाखान्यात कमी दिवस राहावं लागतं. रुग्ण पुर्ववत आपल्या दैनंदिन कामाला लवकर रुजू होऊ शकतो.

एण्डोस्कोपीनंतर काही  समस्या निर्माण होऊ शकतात का?
एण्डोस्कोपीनंतर सहसा काही गुंतागुंत होत नाही, पण जर biopsy साठी तुकडा काढून घेतला असेल तर त्या जागेतून रक्तस्राव होऊ शकतो, जो काही वेळानंतर थांबतो. यासाठी काही औषधोपचाराची गरज नसते.
 

Web Title: ncp chief sharad pawar unwell admitted in breach candy hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.