राष्ट्रवादीने बदलले चार जिल्हाध्यक्ष  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 05:32 IST2018-08-15T05:32:02+5:302018-08-15T05:32:15+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पुणे शहरासह कोल्हापूर शहर, जळगाव ग्रामीण, यवतमाळ या चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले आहेत.

NCP changed four District President | राष्ट्रवादीने बदलले चार जिल्हाध्यक्ष  

राष्ट्रवादीने बदलले चार जिल्हाध्यक्ष  

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पुणे शहरासह कोल्हापूर शहर, जळगाव ग्रामीण, यवतमाळ या चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले आहेत. तर ठाणे शहर, भिवंडी, कोल्हापूर ग्रामीण, सोलापूर शहर आणि जळगाव ग्रामीण या जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांसोबतच कार्याध्यक्षाचे नवीन पद तयार करुन त्यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत.
१० जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष कायम ठेवले आहेत. पक्षांतर्गत जिल्हाध्यक्ष - कार्याध्यक्ष पदासाठी २०१८-२०२० पर्यंतच्या निवडणुका पार पडल्या
असून यापूर्वीच २७ जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नेमणुका जाहीर झाल्या आहेत. उर्वरीत जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष नियुक्त्या लवकरच जाहीर होतील, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष - दशरथ तिवरे, कल्याण - डोंबिवली जिल्हाध्यक्ष - रमेश हनुमंते, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष -आ. ज्योती कलानी, भिवंडी शहरजिल्हाध्यक्ष - खलिद गुड्डू, कार्याध्यक्ष - अनिल फडतरे, पुणे शहर जिल्हाध्यक्ष - चेतन तुपे, सांगली शहर - संजय बजाज आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: NCP changed four District President