नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 08:32 IST2024-09-18T08:32:07+5:302024-09-18T08:32:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.

Nawab Malik's son-in-law's car accident Sameer Khan seriously injured | नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी

नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात कुर्ला येथे झाला असून या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयात नियमित तपासणी करून परतत होते. ते कारमध्ये बसले असताना कार चालकाने चुकून ॲक्सिलेटर दाबल्याने कार भिंतीवर आदळली. समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली असून ते सध्या आयसीयूमध्ये आहेत.

"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा

या अपघातात नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांनाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात मुंबईतील कुर्ला येथे झाला.

Web Title: Nawab Malik's son-in-law's car accident Sameer Khan seriously injured