“दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप असलेला रियाज भाटी हा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:03 PM2021-11-10T12:03:30+5:302021-11-10T13:54:53+5:30

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रियाज भाटी हा भाजपाशी नव्हे तर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा केला. याबाबत रियाज भाटीच्या जुन्या मुलाखतीची क्लीप त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

Nawab Malik vs Fadnavis: Riyaz Bhati accused of being Dawood's accomplice is releted NCP Says BJP | “दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप असलेला रियाज भाटी हा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी”

“दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप असलेला रियाज भाटी हा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी”

googlenewsNext

मुंबई – राज्यातील ड्रग्स प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकारण आता अंडरवर्ल्डपर्यंत पोहचलं आहे. मलिकांनी ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले होते. त्यानंतर मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यानुसार फडणवीसांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मलिकांचे १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत जमीन व्यवहार केल्याचे पुरावे समोर आणले. तेव्हा मलिकांनी मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असं म्हटलं.

नवाब मलिकांनी(Nawab Malik) आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप करताना रियाज भाटी नावाचा उल्लेख केला. दोन पासपोर्ट बनवणाऱ्याला अटक केलेली असताना २ दिवसांत कसं सोडलं? असा दावा मलिकांनी केला. रियाज भाटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढतो असं म्हटलं. त्यानंतर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रियाज भाटी हा भाजपाशी नव्हे तर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा केला.

केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये रियाज भाटीच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची  स्थापना झाली होती तेव्हापासून रियाज भाटी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जनरल सचिव म्हणून तो काम करत होता असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रियाज भाटी प्रकरणावरुन नवाब मलिक स्वपक्षालाच अडचणीत आणतायेत का? असा प्रश्न निर्माण होतो.

काय म्हणाले नवाब मलिक?

रियाज भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाज भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

तसेच मुन्ना यादव हा नागपूरचा कुख्यात गुंड असून हत्येसह अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो दहशत निर्माण करणारा तुमचा मित्र कसा? तोच मुन्ना यादव कन्स्ट्रक्शन वर्कर्स बोर्डचा अध्यक्ष कसा? तुमच्या गंगेत न्हाऊन तो पवित्र झाला होता का? असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, हैदर आझमला मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे अध्यक्षपद कसकाय मिळाले हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो की नाही, त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे की नाही, असाही सवाल मलिक यांनी विचारला आहे.

Web Title: Nawab Malik vs Fadnavis: Riyaz Bhati accused of being Dawood's accomplice is releted NCP Says BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.