Nawab Malik : दिवाळीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीसांनी साधला मलिकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 19:32 IST2021-11-03T19:30:15+5:302021-11-03T19:32:01+5:30

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला.

Nawab Malik : 'Let's light the Diwali lamp, remove the darkness caused by false conspiracies', amruta fadanvis on nawab malik | Nawab Malik : दिवाळीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीसांनी साधला मलिकांवर निशाणा

Nawab Malik : दिवाळीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीसांनी साधला मलिकांवर निशाणा

मुंबई - मंत्री नवाब मलिक यांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला. त्यानंतर भाजपाचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवरही आरोप लावले. त्यामुळे, अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं होतं. वानखेडे मलिक वाद आता भाजपा विरुद्ध मलिक आणि एनसीपी, असा झाला आहे. त्यामुळे, अमृता फडणवीस यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देतानाही चांगलाच टोला लगावलाय.  

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला. मुंबई क्रुझवर NCB ने केलेल्या कारवाईनंतर तपास अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर मलिकांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आता हे प्रकरण भाजपाशी जोडले गेले आहे. त्यास आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच, मलिक यांनी ज्या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो शेअर करण्यात आला त्याबद्दलही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 


आता, अमृता फडणवीस यांनी सर्वांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना महाविकास आघाडी आणि नवाब मलिक यांना नाव न घेता टोला लगावला आहे. चला, दिवाळीच्या शुभदिनी दिवा लावूया, खोटं अन् षडयंत्र रचून आणलेली उदासीला दूर करूया, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

नवाब मलिक यांच्यावर प्रहार

तुम्हाला बिघडे नवाब व्हायचं आहे, तुम्हाला बिघडे नवाबची जी एनर्जी आहे ती सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा, तरंच महाराष्ट्र पुढे जाईल. अन्यथा आपलं खरं नाही. मलिक जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करत आहेत, आमच्याकडे ना लँड बँक आहे, ना साखर कारखाने आहेत, त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक हे बेनकाब होत आहेत, काही सूचत नाही, निगेटीव्हीटी आलेली असते तेव्हा असं केलं जातं. सरळ मार्गाने जाणाऱ्या महिलांना का डिवचता, तेच आज माझ्यासोबत केलं जातंय. तुम्ही मर्द आहात ना मग देवेंद्रजींना डायरेक्ट टार्गेट करा, मला मधी नका आणू. माझ्या अंगावर कुणी आलं तर, मी सोडणार नाही. मी एज ए सोशल एक्टीव्हीस्ट म्हणून माझे विचार प्रकट करत असते, आणि ते यापुढेही करत राहणार, असेही अमृता फडणवीस यांनी ठणकावून सांगितलंय.  

नवाब मलिक काय म्हणाले?

ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणं आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
 

Web Title: Nawab Malik : 'Let's light the Diwali lamp, remove the darkness caused by false conspiracies', amruta fadanvis on nawab malik