Join us

कुटुंब रंगलंय घरफोडीत; नवघर पोलिसांकडून चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 14:42 IST

घरफोडी करणाऱ्या कुटुंबाला पोलिसांकडून बेड्या

मुंबई : दिवसभर प्लास्टिक गोळा करण्याच्या बहाण्यानं घरांची रेकी करुन संधी मिळताच घरफोडी करणाऱ्या एका कुटुंबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवघर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक दाम्पत्य आणि दोघांचा समावेश आहे. प्रकाश अंबादास आव्हाड (४३),  पूजा प्रकाश आव्हाड (४०), अनू पवन आव्हाड (३०) आणि अंजली बोऱ्हाडे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. चारही जण एकाच कुटुंबातील रहिवासी आहेत. ते दिवा येथे वास्तव्यास होते. यातील पूजा ही 5 महिन्यांची गर्भवती आहे. पूजा दिवसभर मुंबईतील विविध भागात प्लास्टिक गोळा करण्याच्या बहाण्यानं रेकी करायची. एखादं घर बंद दिसलं की त्या घराशेजारील परिस्थितीचा अंदाज घ्यायचा. याबद्दलची माहिती आपल्या साथीदारांना द्यायची आणि संधी मिळताच घरफोडी करायची, या पद्धतीनं हे चौघे काम करायचे. या चौघांनी आतापर्यंत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुणे परिसरात घरफोड्या केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.  

टॅग्स :चोरगुन्हावसई विरार