Narhari Zirwal : तुमच्यावर अपात्रतेची कारवाई का करु नये? शिंदे गटातील १६ बंडखोरांना नोटिसा; शिवसेना इन अ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 03:58 PM2022-06-25T15:58:53+5:302022-06-25T16:00:28+5:30

Narhari Zirwal took action against shiv sena 16 rebel mlas notice issue for ineligible शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटिसा बजावत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत.

narhari zirwal took action against shiv sena 16 rebel mlas notice issue for ineligible | Narhari Zirwal : तुमच्यावर अपात्रतेची कारवाई का करु नये? शिंदे गटातील १६ बंडखोरांना नोटिसा; शिवसेना इन अ‍ॅक्शन

Narhari Zirwal : तुमच्यावर अपात्रतेची कारवाई का करु नये? शिंदे गटातील १६ बंडखोरांना नोटिसा; शिवसेना इन अ‍ॅक्शन

Next

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिंदे गटातील आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास शिवसेनेच्या गोटातून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेने १६ आमदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना गटातील १६ आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

शिवसेनेने १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत थेट कायदाच दाखवला आहे. यानंतर आता शिवसेना नेत्यांनी थेट सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केले आहे. शुक्रवारी सुमारे ४ ते ५ तास यावर खलबते करण्यात आली. अखेर शनिवारी या १६ आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सोमवार, २७ जून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. 

१६ आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात नोटिसा

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती देण्यात आलेली आहे. यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे. यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास विधिमंडळात दाखल झाले होते. त्यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील प्रभू हेही विधिमंडळात हजर होते. या प्रदीर्घ चर्चेनंतर आता या १६ आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात कायद्याची बाजू समजून घेण्यासाठी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. 

दरम्यान, शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या बंडखोर आमदारांमध्ये, एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, महेश शिंदे, अनिल बाबर, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी किणीकर, लता सोनावणे, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर, रमेश बोरनारे यांचा समावेश आहे. 
 

Web Title: narhari zirwal took action against shiv sena 16 rebel mlas notice issue for ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.