Join us

नाना पटोलेंनी दाखवला मोदी अन् राजीव गांधींमधील फरक, नेटीझन्सकडून ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 13:33 IST

नाना पटोले यांनी मोदींचा बांधकाम मजूरांसमवेतचा जेवण करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबच, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचाही एक फोटो शेअर केला आहे

ठळक मुद्देनाना पटोले यांच्या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोल केलंय. त्यामध्ये, नानासाहेब, आता गावातही पंतरवळीवरील जेवणाची पद्धत उरली नसल्याचं सांगितंलय.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीवाराणसी दौऱ्यात काशी विश्वनाथ येथील कॉरिडोर प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. मोदींचा हा दौरा या उद्घाटनापेक्षा त्यांच्या इतर एक्टीव्हीटींनीच चर्चचा ठरला. मोदींनी गंगा नदीत घेतलेली डुबकी, काशी विश्वनाथ मंदिराचं बांधकाम करणाऱ्या मंजुरांवर केलेली पुष्पवृष्टी आणि त्यांच्यासमेवत केलेलं जेवण हा चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे मोदींचे ते फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका केली आहे. 

नाना पटोले यांनी मोदींचा बांधकाम मजूरांसमवेतचा जेवण करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबच, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचाही एक फोटो शेअर केला आहे. या दोन्ही फोटोंची तुलना करताना, राजीव गांधी यांनी गरीब व सर्वसामान्यांसोबत केलेलं जेवण हे सहज होतं. तर, मोदींनी बसवलेली पंगत ही उच्च दर्जाचा इव्हेंट असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. पटोले यांनी या ट्विटला अनेकानी रिप्लाय केला असून प्रत्युत्तरात त्यांच्यावरच टीका केली आहे.  नाना पटोले यांच्या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोल केलंय. त्यामध्ये, नानासाहेब, आता गावातही पंतरवळीवरील जेवणाची पद्धत उरली नसल्याचं सांगितंलय. तसेच, शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही आता ताटातच जेवण मिळत असं एका युजर्संने म्हटले आहे. बदललेल्या काळानुसार झालेला हा बदल असल्याचं काहींचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे नानांनी शेअर केलेल्या राजीव गांधींच्या फोटोत ठराविक लोकच जेवण करताना दिसून येत आहेत. त्यांच्या डावीकडील बाजूस 4 लोकांनंतर इतर लोकं जेवण का करत नाहीत? असा सवालही नेटीझन्सने विचारला आहे.    

टॅग्स :नाना पटोलेनरेंद्र मोदीवाराणसी