मुंबई - नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू असल्याची जळजळीत टीका अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केली आहे. काही दिवसांपूर्वी मी टू मोहिमेंतर्गत तनुश्री दत्तानेनाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे न सापडल्याने कोर्टात बी समरी अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा या प्रकरणी १७ जानेवारी रोजी पहिली सुनावणी होईल. मात्र, मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू म्हणून जळजळीत टीका केली आहे. तनुश्री दत्ता हिने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले. निलेश पावसकर यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी मला फसवून या प्रकरणातील पुरावेही नष्ट केले. पावसकर यांनी २००५ पासून नाना पाटेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या लैंगिक शोषणाची प्रकरणे रद्द केली. तसेच नाना पाटेकर आणि मनसेचे काय संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. नाना पाटेकर यांनी त्यावेळी मनसेच्या गुंडांना बोलवून सेटवर गोंधळ घातला. त्यानंतर गणेश आचार्यने माझे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही यावेळी तनुश्री दत्ताने केला. तनुश्रीने या प्रकरणातील पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवरही बोट ठेवले आहे. पोलिसांनी अनेक पुराव्यांशी छेडछाड केल्याचे तिचे म्हणणे आहे.
नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू; तनुश्री दत्ताची जळजळीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:33 IST
तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले.
नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू; तनुश्री दत्ताची जळजळीत टीका
ठळक मुद्देमंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू म्हणून जळजळीत टीका केली आहे. आता पुन्हा या प्रकरणी १७ जानेवारी रोजी पहिली सुनावणी होईल.नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.