नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपी सुजीत कुमारला पोलीस कोठडीत मारहाण, न्यायालयात केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 17:55 IST2018-09-17T17:54:46+5:302018-09-17T17:55:07+5:30
न्यायालयाने तात्काळ त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठविले आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपी सुजीत कुमारला पोलीस कोठडीत मारहाण, न्यायालयात केला दावा
मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी सुजीत कुमार याने पोलीस कोठड़ीमध्ये कंबरेच्या पट्ट्याने आणि काठीने मारहाण केल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने तात्काळ त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठविले आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी कुमारला अटक केली होती. त्याचा ताबा १२ सप्टेंबरला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने आपल्याकडे घेतला आहे. आज वाढीव कोठड़ीसाठी त्याला न्यायालयात आणले असता त्याने पोलीस कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप केल्यांनतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जळगावमधून ताब्यात घेत अटक केलेला आरोपी लीलाधर उर्फ विजय लोधी आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठड़ीमध्ये २४ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.