Join us  

"माझा श्रीकांत डॉक्टर झाला, पण मी त्याला दवाखाना टाकून देऊ शकलो नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 9:02 PM

मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्ता ते शिवसेना मंत्री होताना आपण आजपर्यंत अनेक केसेस अंगावर घेतल्याची आठवण सांगितली.

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर आता दोन्ही शिवसेनेकडून वर्धापन दिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिंदे गटाकडून वर्धापन दिन साजरा होत असून शिंदे गटाचे दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत. या सोहळ्यात भाषण करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही आपल्या कामाची माहिती देत शिवसेनेसाठी आम्ही खस्ता खाल्ल्याचे सांगितले. तसेच, मुख्यमंत्री असताना केवळ २ दिवसच तुम्हा घराबाहेर पडले, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्ता ते शिवसेना मंत्री होताना आपण आजपर्यंत अनेक केसेस अंगावर घेतल्याची आठवण सांगितली. बाळासाहेबांच्या विचारांनी पेटून आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली, असे सांगताना एकनाथ शिंदेंनी काही भावनिक प्रसंग सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगत शिवसेनेसाठी आपण सर्वस्व वाहून घेतल्याचं म्हटलं. मी वयाच्या २२ व्या वर्षी कर्नाटकच्या तुरुंगात ४० होतो. माझा मुलगा श्रीकांत डॉक्टर झाला, एमडी झाला, सर्जन झाला. श्रीकांतने माझ्याकडे दवाखाना टाकून देण्याची मागणी केली. मात्र, मी त्याला दवाखाना टाकून देऊ शकलो नाही. कारण, दवाखाना टाकायचा म्हटलं की आली निवडणूक.. मग निघालो निवडणुकांसाठी, मग निवडणुकीत हॉस्पिटलसाठीचे पैसे लावायचे. या एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्यात असं सांगत कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही, पण शिवसेनेलाच कुटुंब मानलं, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

आईच्या निधनाचा भावनिक प्रसंग 

एकनाथ शिंदेंनी यावेळी एक भावनिक प्रसंग सांगितला. माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. त्यावेळी, मी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारात व्यस्त होतो. तेवढ्यात मला डॉक्टरांचा फोन आला, डॉक्टरांचा फोन येताच मनात पाल चुकचुकली. पण, मला सांगितलं आपल्याल इथं इथं सभा घ्यायच्या आहेत, त्यावेळी मी हो म्हणत या सभा घेऊ म्हटलं, आधी ते काम केलं. त्यानंतर, दवाखान्यात जाऊन आईचं अंत्यदर्शन घेतलं, असा भावनिक प्रसंग एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितला. 

टॅग्स :एकनाथ शिंदेश्रीकांत शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना