Join us

प्रेयसीची बलात्कारानंतर हत्या, न्याय मिळेना; प्रियकराकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

By मुकेश चव्हाण | Updated: November 17, 2022 16:35 IST

पोलिसांनी बापू नारायण मोकाशीला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मुंबई- बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळी मुळे सदर तरुणाचा जीव वाचला. पोलिसांनी बापू नारायण मोकाशीला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या बापू नारायण मोकाशी आज मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा, यासाठी बापू नारायण मोकाशी यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. 

बापू नारायण मोकाशी यांनी चारवेळा मंत्रालयात पत्र दिले होते. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा पत्र दिले होते. तसेच सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्र दिले होते. मात्र यानंतरही कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नसल्याने हतबल झालेल्या बापू नारायण मोकाशी यांनी उडी मारली. परंतु सुरक्षा जाळी असल्यामुळे बचावला, पण जाळीत अडकल्याने ते जखमी झाले आहेत. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकारपोलिसबीड