Municipal Elections 2026: ठाकरेंचे स्टार प्रचारक ठरले, संजय राऊत प्रचारात दिसणार की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:10 IST2026-01-05T13:07:25+5:302026-01-05T13:10:49+5:30
BMC Elections 2026 Shiv Sena UBT: महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. आजारपणामुळे खासदार संजय राऊत महापालिकेच्या प्रचारात दिसणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्याबद्दलही या यादीमुळे स्पष्टता आली आहे.

Municipal Elections 2026: ठाकरेंचे स्टार प्रचारक ठरले, संजय राऊत प्रचारात दिसणार की नाही?
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेकडून स्टार प्रचारकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ आणि तरुण अशा दोन्ही फळीतील नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली असून, आजारपणामुळे गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक जीवनातून दूर असलेले खासदार संजय राऊत प्रचारात दिसणार आहेत. सुभाष देसाईंपासून ते वरुण सरदेसाईंपर्यंत असे ४० स्टार प्रचारक जाहीर करण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे अवघे सात-आठ दिवसच उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी प्रचारात झोकून दिले असून, उद्धवसेनेकडूनही स्टार प्रचारक जाहीर करण्यात आले आहेत.
उद्धवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी
१) उद्धव ठाकरे
२) आदित्य ठाकरे
३) संजय राऊत
४) आदेश बांदेकर
५) सुभाष देसाई
६) अनंत गीते
७) चंद्रकांत खैरे
८) अरविंद सावंत
९) भास्कर जाधव
१०) अनिल देसाई
११) विनायक राऊत
१२) अनिल परब
१३) राजन विचारे
१४) सुनील प्रभू
१५) वरुण सरदेसाई
१६) अंबादास दानवे
१७) रवींद्र मिर्लेकर
१८) नितीन पाटील
१९) राजकुमार बाफना
२०) प्रियंका चतुर्वेदी
२१) सचिन अहिर
२२) लक्ष्मण वाढले
२३) मनोज जामसुतकर
२४) नितीन देशमुख
२५) सुषमा अंधारे
२६) संजय जाधव
२७) ज्योती ठाकरे
२८) जयश्री शेळके
२९) जान्हवी सावंत
३०) शरद कोळी
३१) ओमराजे निंबाळकर
३२) सुनील शिंदे
३३) हारुन खान
३४) सिद्धार्थ खरात
३५) वैभव नाईक
३६) आनंद दुबे
३७) अशोक तिवारी
३८) राम साळगावकर
३९) प्रियांका जोशी
४०) अनिश गाढवे
राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची आज सभा
मुंबई महापालिकेसाठी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिली संयुक्त सभा होणार आहे. मुंबई पूर्व उपनगर म्हणजे विक्रोळीमध्ये ही सभा होत आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही संयुक्त सभा होणार आहेत.