महापालिका आयुक्त ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरे यांच्याशी चाय पे चर्चा, पण नेमका विषय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:07 IST2025-07-30T12:06:41+5:302025-07-30T12:07:46+5:30

किमान अर्धा ते पाऊण तास आयुक्त आणि राज यांच्यात चर्चा झाली. 

municipal commissioner visit shivtirth and meet raj thackeray over tea | महापालिका आयुक्त ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरे यांच्याशी चाय पे चर्चा, पण नेमका विषय काय?

महापालिका आयुक्त ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरे यांच्याशी चाय पे चर्चा, पण नेमका विषय काय?

मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी शिवाजी पार्क मैदानाला भेट दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट दिली. यावेळी किमान अर्धा ते पाऊण तास आयुक्त आणि राज यांच्यात चर्चा झाली. 

ही भेट फक्त या दोघांच्यातच झाल्याने मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला भेटीच्या तपशीलाविषयी माहिती नव्हती. याबाबत गगराणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून शिवाजी पार्क मैदानाला भेट देण्याचे नियोजन होते. 

तिथल्या स्थानिकांचा आग्रह होता आणि मलाही पाहणी करून समस्या जाणून घायच्या होत्या. त्या निमित्ताने मी गेलो होतो, त्याचवेळी मला राज ठाकरे यांचा फोन आला. चहा प्यायला घरी या, असे निमंत्रण त्यांनी मला दिले. पाहणी दौरा आटपून मी त्यांच्या घरी गेलो. चहापान झाले, थोड्या गप्पा झाल्या. या भेटीत विशेष असे काही नव्हते.

 

Web Title: municipal commissioner visit shivtirth and meet raj thackeray over tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.