मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:31 IST2025-08-18T10:30:35+5:302025-08-18T10:31:38+5:30

सातही धरणांची साठवण क्षमता १४.४७ लाख दशलक्ष लिटर असून आता धरणांत १३ लाख द.ल.लि. साठा आहे.

Mumbai's year-round thirst will be quenched, all seven reservoirs are almost full due to heavy rains | मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल

मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रीपासून हाेणाऱ्या धो धो पावसाने जलसाठा वाढला आहे. धरणांत पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला असून, वर्षभराची तहान भागेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार व तुळशी या धरणांतून रोज ३,९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा हाेतो. सातही धरणांची साठवण क्षमता १४.४७ लाख दशलक्ष लिटर असून आता धरणांत १३ लाख द.ल.लि. साठा आहे.

तीन वर्षांतील पाणीसाठा

तारीख     साठा     टक्के

  • १७ ऑगस्ट २०२५     १३,०४,९८१     ९०.१६
  • १७ ऑगस्ट २०२४     १३,४९,३६४     ९३.२३
  • १७ ऑगस्ट २०२२    १२,०७,३९३     ८३.४२

पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

सातही जलाशयांत साठा

जलाशय     पाणीसाठा     टक्के

  • अप्पर वैतरणा     १,९४,८५४     ८५.८२
  • मोडक सागर     १,१४,०८१     ८८.४९
  • तानसा     १,४२,२९८     ९८.०८
  • मध्य वैतरणा     १,८६,२९७     ९६.२६
  • भातसा     ६,३५,६३८     ८८.६५
  • विहार     २४,०९८     ८७
  • तुळशी     ७,७१५     ९५.८८

एकूण     १३,०४,९८१     ९०.१६
पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

Web Title: Mumbai's year-round thirst will be quenched, all seven reservoirs are almost full due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.