वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:25 AM2020-01-23T03:25:31+5:302020-01-23T03:26:48+5:30

मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे? मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात? मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का?

Mumbai's white lungs become black due to air pollution | वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष

वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष

Next

मुंबई  - मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे? मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात? मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का? केवळ बीकेसी नाही, तर माझगाव, वरळी, अंधेरीसारखे परिसरही प्रदूषणाने वेढले आहेत का? यामध्ये नवी मुंबईचीही भर पडत आहे का? मुंबईचे वातावरण किती प्रदूषित आहे? मुंबईकर खरेच प्रदूषित हवा श्वसनाद्वारे शरीरात घेत आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मुंबईत नुकताच एक नवा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगानुसार, वांद्रे येथील आर. डी. नॅशनल कॉलेजच्या बाहेर पांढऱ्या रंगाची कृत्रिम फुप्फुसे लावण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे १४ जानेवारी रोजी लावण्यात आलेल्या या फुप्फुसांचा पांढरा रंग आजघडीला प्रदूषणामुळे चक्क काळा झाला आहे.

१४ जानेवारी रोजी ‘वातावरण’ आणि ‘झटका’ या पर्यावरणासंदर्भात काम पाहणाºया संस्थांद्वारे, प्रत्येक श्वास महत्त्वाचा आहे, असे म्हणणारा कृत्रिम पांढºया फुप्फुसांचा बिलीबोर्ड व त्यावरील फुप्फुसे वांद्रे येथील आर. डी. नॅशनल कॉलेजच्या बाहेर वर्दळ असलेल्या भागात रस्त्याशेजारी लावण्यात आली, अशी माहिती वातावरण फाउंडेशनकडून देण्यात आली. आपण कुठल्या गुणवत्तेच्या हवेत श्वास घेतोय? हा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर याचे उत्तरही या प्रयोगाने दिले आहे. कारण वाहनांमुळे व धुळीमुळे होणा-या वायुप्रदूषणाच्या भीषणतेमुळे फुप्फुसांचा रंग बदलला आहे. सुरुवातीला तो पांढरा होता, आता तो काळा झाला आहे. या माध्यमातून मुंबईने एका अर्थाने हवेची परीक्षाच दिली आहे, असे वातावरण फाउंडेशनने सांगितले.

दोन वर्षांपूर्वी हा बिलीबोर्ड बंगळुरूमध्ये लावण्यात आला होता. तेव्हा लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. फुप्फुसे काळी पडताना बघून लोकांमध्ये भीती निर्माण होते. समस्येची गंभीरता लक्षात येऊन त्याविरुद्ध जनजागृतीस मदत होते आहे. मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी भयंकर वाढली आहे. म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम राबवून लोकांमध्ये तसेच सरकारलाही जाग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे झटका या संस्थेसह वातावरण फाउंडेशनने सांगितले.

असा करण्यात आला प्रयोग
पांढरी दिसणारी ही फुप्फुसे बनविण्यासाठी हेपा फिल्टर्स वापरण्यात आले.
ही फिल्टर्स आॅपरेशनसाठी, मास्क बनविण्यासाठी व धूळ पकडण्यासाठी वापरली जातात.
या फुप्फुसांच्या मागे पंखे जोडले गेले होते; जे हवा खेचून घेत होते.
संपूर्ण बिलीबोर्ड खºया फुप्फुसाचा आभास तयार करीत होते.
मागील काही दिवसांत या फिल्टर्सने हवेतील, वाहनातून निघणारे धूलिकण, पार्टिक्युलेट कण पकडण्यास सुरुवात केली.
त्यामुळे या कृत्रिम फुप्फुसांचा रंग बदलण्यास सुरुवात झाली.
प्रदूषणामुळे या फुप्फुसांचा रंग काळा होत आहे.

Web Title: Mumbai's white lungs become black due to air pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.