मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:40 IST2025-10-13T12:39:57+5:302025-10-13T12:40:17+5:30
सुमारे एक तास संपूर्ण विद्युत पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. संबंधित दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख यंत्रणेतील पांजरापूर येथील उदंचन केंद्र क्रमांक ३ अ येथे २३० व्होल्ट ए.सी. कॉन्टॅक्टर बंद झाल्यामुळे पाणीउदंचन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाला आहे.
महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाने कळविले आहे की, हा कॉन्टॅक्टर तातडीने बदलणे आवश्यक असून त्यासाठी सुमारे एक तास संपूर्ण विद्युत पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. संबंधित दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. दरम्यान दुरुस्तीच्या कालावधीत शहरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर संयमाने आणि काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या जलपुरवठा विभागाने दिली.