मुंबईतील उर्वरित दहा टक्के पाणी कपात २९ ऑगस्टपासून रद्द; तलाव क्षेत्रात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:53 PM2020-08-28T15:53:11+5:302020-08-28T15:54:47+5:30

आतापर्यंत तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे चार तलाव भरून वाहू लागले आहेत.

Mumbai's remaining 10 per cent water cut canceled from August 29 | मुंबईतील उर्वरित दहा टक्के पाणी कपात २९ ऑगस्टपासून रद्द; तलाव क्षेत्रात दमदार पाऊस

मुंबईतील उर्वरित दहा टक्के पाणी कपात २९ ऑगस्टपासून रद्द; तलाव क्षेत्रात दमदार पाऊस

Next

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण ३४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र गेल्या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे आता सुमारे ९५ टक्के जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे.

आतापर्यंत तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे चार तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा आणि भातसा तलावही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे.वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. २० पैकी दहा टक्के पाणीकपात २१ ऑगस्टपासून महापालिकेने मागे घेतली होती. त्यानंतर आता शनिवारी उर्वरित दहा टक्के पाणीकपात मागे घेण्यात येणार आहे.

Read in English

Web Title: Mumbai's remaining 10 per cent water cut canceled from August 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.