मुंबईकरांना मिळणार संकटग्रस्त वन्यजिवांची संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:44 AM2021-03-03T06:44:29+5:302021-03-03T06:44:49+5:30

वन्यजिवांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासह नागरिकांपर्यंत त्यांची संपूर्ण माहिती पोहोचावी हादेखील  उद्देश असल्याचे संस्थेने सांगितले.

Mumbaikars will get complete information about endangered wildlife | मुंबईकरांना मिळणार संकटग्रस्त वन्यजिवांची संपूर्ण माहिती

मुंबईकरांना मिळणार संकटग्रस्त वन्यजिवांची संपूर्ण माहिती

Next

- सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात जंगलांचे प्रमाण कमी होत असले तरी वन्यजिवांची माहिती वन्यप्रेमींना आणि मुंबईकरांना मिळावी यासाठी धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने  पुढाकार घेतला आहे. उद्यानाच्या नव्या प्रकल्पानुसार उद्यानाच्या आवारातील भिंतींवर संकटग्रस्त  वन्यजिवांची माहिती प्रदर्शित केली जात आहे. 
    या माध्यमातून वन्यजिवांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासह नागरिकांपर्यंत त्यांची संपूर्ण माहिती पोहोचावी हादेखील  उद्देश असल्याचे संस्थेने सांगितले.
 

निसर्गातील विविध पैलूंचा 
सोप्या पद्धतीने हाेणार उलगडा
nउद्यानास भेट देणाऱ्या अभ्यंगतांना निसर्गातील विविध पैलूंचा उलगडा सोप्या पद्धतीने व्हावा तसेच निसर्ग शिक्षण हे उद्यानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेमधील शैक्षणिक इमारत केंद्राच्या भिंतींवर विविध चित्रे काढण्यात आल्याचे उद्यानाचे संचालक अशोक वाघाये यांनी सांगितले. भारतामधील संकटग्रस्त प्राणी कोणते आहेत?  ते संकटग्रस्त का झाले आहेत? याची माहितीही या चित्रांतून मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

nमहाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेमधील  शैक्षणिक इमारत केंद्राच्या भिंतींवर संकटग्रस्त प्राणी, झाडांपासून मानवाला होणारे फायदे, अन्नसाखळी आणि अन्नजाळी, जलचक्र यासारखी निसर्गाशी निगडित विविध चित्रे तानाजी जाधव यांनी काढली आहेत.

Web Title: Mumbaikars will get complete information about endangered wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल