Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! मंगळवारी 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 18:22 IST

Mumbai Water Cut News: मुंबईतील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये पाणीटंचाईचा सामना लोकांना करावा लागू शकतो. 

येत्या मंगळवारी म्हणजे १० फेब्रुवारी रोजी मुंबईतील काही भागांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले की, पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील किंवा कमी दाबाने येईल. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा. 

मुंबई महापालिकेने वांद्रे पश्चिम येथील ९०० मि.मी.  व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे गरजेचे असलेल्या काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या काळात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

१४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणार आहे. पाली हिल जलाशयाच्या ९०० मि. व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याचे आढळून आले. वांद्रे पश्चिममधील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळ एमएचएडीएच्या मोकळ्या भूखंडात, तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या वाहिनीवर दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. 

मुंबईतील कोणत्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार?

वांद्रे पश्चिम भागातील हिल रोड, पाली हिल, कार्टर रोड, सेंट अँड्र्यूज मार्ग, पाली गाव, चिंबई, शेर्ली गाव, कांतवाडी तसेच खार दाडा, कोळीवाडा, दांडा पाडा, चुईम गावठाण, खार पश्चिममधील काही भाग, माऊंट मेरी परिसर, के.सी. मार्ग, बाजार रस्ता, पाली माला, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एँड, बी.जे. मार्ग, एच.के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि झोपडपट्टी परिसरात मध्यरात्री १ वाजेपासून ते पहाटे ४.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Water Supply Disruption: Several Areas to Face Water Cut Tuesday

Web Summary : Due to urgent repairs on a water pipeline, several areas of Mumbai's Bandra West will face a complete water supply shutdown on Tuesday, February 10th, from 10 AM to midnight. Other areas will experience low water pressure during late night hours. Residents are advised to use water sparingly.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणी कपातपाणी टंचाईमुंबई