मुंबईकरांनो लक्ष द्या! विक्रोळी, घाटकोपर, भांडुपसह शहरात तीन दिवस पाणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:36 IST2025-10-04T12:36:03+5:302025-10-04T12:36:25+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! विक्रोळी, घाटकोपर, भांडुपसह शहरात तीन दिवस पाणीबाणी
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ७, ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी रोज दुपारी हे काम केले जाईल. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतांश विभागांचा पाणीपुरवठा सलग तीन दिवस प्रभावित होऊ शकतो. येथे तीन दिवस १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात; तसेच पूर्व उपनगरांतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागांत संपूर्ण परिसरात ही पाणीकपात लागू केली जाणार आहे. पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व), एन विभागात विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रांत १० टक्के पाणीकपात लागू राहील. ७-९ ऑक्टोबरदरम्यान पाणीकपात केली जाणार आहे.
प्रभावित विभाग :
शहर विभाग : ए, बी, ई, एफ दक्षिण एफ उत्तर या विभागांमधील सर्व भागांत कपात लागू असेल.
पूर्व उपनगरे :
एल विभाग : कुर्ला पूर्व क्षेत्र
एम पूर्व विभाग - संपूर्ण विभाग
एम पश्चिम विभाग - संपूर्ण विभाग
एन विभाग - विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर
एस विभाग - भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व क्षेत्र
टी विभाग - मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्र