मुंबईकरांनो रविवारी लोकल प्रवास टाळा, गर्दीत सापडाल, ठाणे - कल्याण जलद मार्गावर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 08:14 IST2025-09-20T08:11:47+5:302025-09-20T08:14:11+5:30

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी११.०५ ते दुपारी ५.०५ वाजेपर्यंत मेगाबलॉक असणार आहे.

Mumbaikars, avoid local travel on Sunday, you will find yourself in a crowd, mega block on Thane-Kalyan fast line | मुंबईकरांनो रविवारी लोकल प्रवास टाळा, गर्दीत सापडाल, ठाणे - कल्याण जलद मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईकरांनो रविवारी लोकल प्रवास टाळा, गर्दीत सापडाल, ठाणे - कल्याण जलद मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या पाच तासांच्या कालावधीत घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( सीएसएमटी - कल्याण दरम्यानच्या लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. परिणामी त्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील. त्यामुळे रविवारी लोकल प्रवासादरम्यान प्रचंड गर्दीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी११.०५ ते दुपारी ५.०५ वाजेपर्यंत मेगाबलॉक असणार आहे. हा ब्लॉक पोर्ट मार्गीका वगळून घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर मार्गीकेवरील गाड्या रद्द करण्यात येतील.

तर पनवेल - ठाणे ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात येतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी– वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान उपलब्ध राहील. ब्लॉक कालावधीत पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध राहील.

Web Title: Mumbaikars, avoid local travel on Sunday, you will find yourself in a crowd, mega block on Thane-Kalyan fast line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.