Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 18:09 IST2025-12-28T18:04:17+5:302025-12-28T18:09:11+5:30

Mumbai Auto Rickshaw Driver Viral Video: सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

Mumbai Woman Traveling To AP Dhillon Concert In Bandra Shares Scary Auto Experience, Complaint Filed Against Driver | Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!

Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!

सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वांद्रे स्थानक ते जिओ कन्व्हेन्शन सेंटर असा प्रवास करणाऱ्या दोन तरुणींसोबत एका रिक्षाचालकाने संतापजनक कृत्य केले. केवळ मोठ्याने बोलत असल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाने या तरुणींना अर्ध्यारस्त्यात उतरवून शिवीगाळ केली, इतकेच नव्हे तर त्यांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी प्रसिद्ध गायक एपी ढिल्लनच्या कार्यक्रमासाठी जिओ कन्व्हेन्शन सेंटरकडे जात होत्या. वांद्रे स्थानकावरून त्यांनी रिक्षा पकडली. प्रवासादरम्यान या मैत्रिणी आपापसात बोलत असताना, रिक्षाचालकाने 'तुम्ही खूप मोठ्याने बोलत आहात' असे म्हणत अचानक रिक्षा थांबवली आणि त्यांना खाली उतरण्यास सांगितले.

संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद

तरुणींनी जिओ कन्व्हेन्शन सेंटरकडे पोहोचल्या नंतरच पैसे देऊ, असे म्हटले. मात्र, त्यामुळे रिक्षाचालक संतापला आणि त्याने तरुणींना शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. तरुणींनी आपल्या सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली, तेव्हा रिक्षाचालकाने थेट त्यांच्या अंगावर रिक्षा चढवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या घटनेत तरुणीला कोणतीही दुखापत झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, काही मीटर अंतरावर ट्रॅफिक पोलीस तैनात असूनही रिक्षाचालक तरुणींशी गैरवर्तन करत होता.


पोलिसांत तक्रार दाखल

रिक्षाचालकाच्या गैरवर्तनानंतर तरुणींनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. संबंधित घटनेचे व्हिडिओ पुरावे आणि रिक्षाचा क्रमांक पोलिसांना देण्यात आला असून रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "अशा प्रकारचे वर्तन अजिबात स्वीकारार्ह नाही", असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले.

Web Title : मुंबई: ऑटो चालक ने महिलाओं को बीच रास्ते उतारा, बदसलूकी की।

Web Summary : मुंबई में एक ऑटो चालक ने दो महिलाओं को ज़ोर से बात करने पर बीच रास्ते उतार दिया। उसने गाली गलौज की और उन्हें कुचलने की कोशिश की। पुलिस में शिकायत दर्ज, जांच जारी है।

Web Title : Mumbai: Rickshaw driver harasses women, throws them out mid-ride.

Web Summary : In Mumbai, a rickshaw driver forced two women out for talking loudly. He verbally abused them and attempted to run them over. A police complaint has been filed, and an investigation is underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.