...तर मुंबईची तुंबई होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 02:44 AM2018-10-21T02:44:55+5:302018-10-21T02:44:57+5:30

मुंबईतील मलनि:सारण आणि जलनि:सारण वाहिन्यांची सफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने समान कामास समान वेतनाची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Mumbai will be Mumbai ... | ...तर मुंबईची तुंबई होणार!

...तर मुंबईची तुंबई होणार!

Next

- चेतन ननावरे 
मुंबई : मुंबईतील मलनि:सारण आणि जलनि:सारण वाहिन्यांची सफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने समान कामास समान वेतनाची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच समान वेतन मागणाºया ज्या कामगारांना कंत्राटदारांनी कामावरून कमी केले आहे, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी, २३ आॅक्टोबरपासून बेमुदत धरणे देण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात इतर कामगार उतरल्यास मुंबईची तुंबई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मनपाच्या जल व मलनि:सारण वाहिन्यांच्या सफाईसाठी असलेल्या एकूण १३० कामगारांपैकी १०० कामगार कंत्राटी स्वरूपात असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की, या ठिकाणी सुरू असलेल्या ठेकेदारी पद्धतीमुळे कंत्राटी कामगारांचे शोषण होत आहे. मुळात मुंबई महापालिकेकडे नोंदणी प्रमाणपत्रच नसल्याने त्यांना या कामाचा ठेकाच देता येत नाही. त्यामुळे चारही ठेकेदार अनधिकृतपणे हे काम करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या चार ठेकेदारांना मनपाने ठेके दिले आहेत, ते केवळ पगार वाटायचे काम करत आहेत. कारण कामगारांना ड्युटी वाटण्यासाठी मार्गदर्शन करणे व काम करून घेण्याची जबाबदारी मनपा अधिकारीच पार पाडत आहेत. त्यामुळे केवळ पगार वाटण्यासाठी ठेके देण्याची गरज काय, असा सवाल मनपाला निवेदनातून विचारला आहे. मात्र मनपा कोणतीही कार्यवाही करत नाही. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला.
मनपाकडून कामगारांना एका दिवसासाठी ५८० रुपये दिले जातात. मात्र कंत्राटदारांकडून प्रत्यक्ष कामगारांना ५०० रुपयेही मिळत नसल्याचा आरोप संघटनेचे चिटणीस विजय दळवी यांनी केला आहे. दळवी म्हणाले की, ज्या १८ कामगारांनी समान कामास समान वेतन मागितले, त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे संबंधित कामगारांना तत्काळ सेवेत घेऊन सर्व कामगारांना समान कामास समान वेतन देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
>...म्हणून वाहिन्या तुंबतील!
मुळात मुंबईची लोकसंख्या आणि भौगोलिक रचना पाहता जल व मलनि:सारणासाठी केवळ १३० कामगार ही संख्या खूपच तोकडी आहे. त्यात कामगारांना दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत असून त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा रोष कार्यरत कामगारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संबंधित कामगारही बेमुदत आंदोलनात उतरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुंबापुरीची तुंबापुरी होण्यास वेळ लागणार नाही.
>मॅनहोलमध्ये उतरणाºया कामगारांचे काय?
कंत्राटदारांनी कामगारांकडून मॅनहोलमध्ये उतरू नये, असे लेखी लिहून घेतलेले आहे. मात्र मनपा अधिकाºयांकडून कामगारांना बहुतेक वेळा मॅनहोलमध्ये सफाईसाठी उतरवले जाते. हेच कारण दाखवत एका कंपनीने कामगाराला कमी केले आहे.अलिखितपणे वाहिन्यांमध्ये कामगारांना उतरवण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल
घ्यावी म्हणून २३ आॅक्टोबरला आझाद मैदानात बेमुदत धरणे सुरू करणार असल्याची माहिती संघटनेने दिली.

Web Title: Mumbai will be Mumbai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.