Mumbai: वेब सिरीजची ऑफर देत विद्यार्थिनीला जाळ्यात अडकलं, नंतर तिच्यासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:27 IST2025-06-20T13:26:32+5:302025-06-20T13:27:37+5:30

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत सेक्सटॉर्शन करत तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला.

Mumbai: Web series offer and sextortion of student | Mumbai: वेब सिरीजची ऑफर देत विद्यार्थिनीला जाळ्यात अडकलं, नंतर तिच्यासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना

Mumbai: वेब सिरीजची ऑफर देत विद्यार्थिनीला जाळ्यात अडकलं, नंतर तिच्यासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत सेक्सटॉर्शन करत तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेने डी. एन. नगर पोलिसात तक्रार दिल्यावर स्वतःला वेब सिरीजचा प्रोड्युसर असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार विद्यार्थिनी रूपाला (नावात बदलत) ११ जून रोजी व्हाॅट्सॲप क्रमांकवरून वेब सिरीजमध्ये काम करण्याची ऑफर असलेला मेसेज पाठवत त्या व्यक्तीने त्याचे नाव भावेश सांगितले. त्याचा जी. एम. स्टुडिओ असून तो निर्माता, तर राहुल पटेल हा दिग्दर्शक असल्याचेही त्यात नमूद होते. त्यामुळे रूपाने त्यांना होकार कळविला आणि त्यांनी तिची सर्व माहिती तसेच कामाचा अनुभव विचारला. त्यावर तिने स्वतःची माहिती  इन्स्टाग्राम अकाउंट आणि यू ट्यूबची लिंक पाठवली. त्यानंतर आरोपींनी वेब सिरीजची माहिती देत दोनच दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन रूपाला दिले. यामध्ये शिवम अगरवाल हा व्यक्ती मुख्य भूमिकेत असणार असून त्याच्याशी ओळख वाढण्याचा सल्ला दिला भावेशने दिला. ११ जून रोजी इन्स्टाग्रामवरून शिवम जाय नावाचा व्यक्ती तिच्या संपर्कात आला. 

नंबर केला ब्लॉक
भावेशच्या सांगण्यावरून फ्लाईटचे तिकीट काढण्यासाठी ५ हजार तिने आरोपींना ऑनलाइन पाठविले. थोडे थोडे करत आरोपींनी तिच्याकडून ९ हजार ८३६ रुपये उकळले. 
भावेशने रूपाला शिवमसोबत चर्चगेटच्या मेट्रो आयनॉक्स या ठिकाणी १३ जून रोजी चित्रपट पाहायला पाठविले. चित्रपट पाहून झाल्यानंतर रूपा अंधेरीला पोहोचली आणि भावेशने पुन्हा तिला फोन करत शिवम घरी आला नसून कुठे निघून गेला आहे. त्याच्याशी बोल त्याला पुन्हा भेट असे उत्तर दिले. यावर पुन्हा भेटणार नसल्याचे भावेशला सांगत त्याचा नंबर ब्लॉक केला. 

धमकीनंतर गुन्हा दाखल...
अखेर १५ जून रोजी रात्री १२:३० च्या सुमारास भावेशने रूपाला मेसेज करत तिच्याकडून चाळीस हजार रुपयांची मागणी केली. तिचा चेहरा असलेला अर्ध नग्न अवस्थेतील फोटो पाठविला.  तिने पैसे न पाठवल्यास हा फोटो तुझे वडील आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर पाठवून मी तुझी बदनामी करेल, अशी धमकीही दिली. तो क्रमांक तिने ब्लॉक केल्यावर तिच्या बहिणीच्या मोबाईलवर दुपारी दोनच्या सुमारास अशाच प्रकारचा मेसेज देत धमकी देण्यात आली आणि तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली.

Web Title: Mumbai: Web series offer and sextortion of student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.