चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:55 IST2025-04-19T12:51:49+5:302025-04-19T12:55:25+5:30

मुंबईतील चेंबूर येथे नागरिकांना पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी लांबीची जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा बंद झाला.

Mumbai Water Supply News: Sion, Chembur, Ghatkopar, Kurla Among Areas Facing Water Cuts After 1200 mm Pipeline Burst in Chembur | चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!

चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!

मुंबईतील चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी लांबीची जलवाहिनी फुटली. परिणामी शहर आणि पूर्व उपनगरातील अनेक प्रमुख भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  महापालिकेने तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले असून नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमर महल जंक्शनजवळ सुरू असलेल्या मेट्रो बांधकामामुळे १२०० मिमी लांबीची पाण्याची जलवाहिनी फुटली. महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान त्याच ठिकाणी असलेली १८०० मिमी लांबीची मुख्य जलवाहिनी तात्पुरती बंद करण्यात आली. परिणामी, चेंबूर, शिवाजी नगर, मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला, सायन, वडाळा आणि परळ या भागांतील पाणीपुरवठा खंडीत झाला.

एका वरिष्ठ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'या भागांत पुढील २४ तास पाणीपुरवठा बंद राहील. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.' या काळात रहिवाशांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.

चेंबूर: वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ कॉलनी, लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, कॉलनी पोस्ट, एस.टी. रोड, सी.जी. गिडवाणी रोड, उमरशीन बाप्पा चौक, चेंबूर नाका, चेंबूर मार्केट, वाशी गाव, भक्ती पार्क, अंबापाडा, माहुल गाव, म्हाडा बिल्डिंग, म्हैसूर कॉलनी, जिजामाता नगर, माहुल रोड, एम.एस. इमारती, राम टेकडी, सिंधी सोसायटी, चेंबूर कॉलनी, कलेक्टर कॉलनी, मारवली चर्च, नवजीवन सोसायटी, बसंत पार्क, छेडा नगर, छेडा गाव, गोल्फ क्लब, व्ही.एन. पुरव मार्ग, आर.सी. मार्ग.

एम- पूर्व विभाग
गोवंडी: अहिल्याबाई होळकर मार्ग, रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, ९० फूट रोड सेक्टर १३, १४, १५, मंडाळा, २० फूट आणि ३० फूट रस्ते, एकता नगर, म्हाडाच्या इमारती; कमलरामन नगर, बैंगणवाडी रोड १०-१३, आदर्श नगर; रमण मामा नगर, शिवाजी नगर रस्ते ०६–१०, शास्त्री नगर, चर्च रोड, संजय नगर भाग-२; शिवाजी नगर रस्ते ०१-०६, जनता टिंबर मार्ट परिसर, लोटस कॉलनी, गौतम नगर, गोवंडी स्टेशन रोड, दत्त नगर, देवनार बीएमसी कॉलनी, साठे नगर, झाकीर हुसेन नगर, लल्लूभाई म्हाडा इमारती; जनकल्याण सोसायटी, मानखुर्द, पीएमजीपी कॉलनी, डॉ. आंबेडकर नगर, जेजे रोड (ए, बी, आय, एफ सेक्टर), सी, डी, ई, जी, एच, जे, के सेक्टर, चिता कॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम रोड, बालाजी मंदिर मार्ग, देवनार गाव रोड, गोवन रोड. पुरव मार्ग, बीकेएसडी स्ता परिसर, दूरसंचार कारखाना, बीएआरसी, नेव्हल डॉकयार्ड मानखुर्द, मांडळा गाव, संरक्षण क्षेत्र, एसपीपीपीएल इमारती, महाराष्ट्र नगर, समता चाळ, भीम नगर रहिवाशी संघ, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर; देवनार फार्म रोड, बोरबादेवी, घाटला, बीएआरसी फॅक्टरी, बीएआरसी.

एन विभाग
घाटकोपर: राजावाडी पूर्व, चित्तरंजन नगर, विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, एम.जी. रोड, पंतनगर, नवीन पंतनगर, विक्रांत सर्कल, पटेल चौक, आंबेडकर सर्कल, ९० फूट रोड. लक्ष्मी नगर, लक्ष्मीबाग, गरोडिया नगर, नायडू कॉलनी, शास्त्रीनगर, गुरुनानक नगर, जवाहर मार्ग, गौरीशंकर मार्ग, रमाबाई नगर, कामराज नगर, नेताजी नगर, चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट रोड, एन. रोड, महिंद्रा पार्क, डीएस पथ, खलाईगाव, किरोळगाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, नवरोजी गल्ली, एचआर देसाई मार्ग, जेव्ही रोड, ध्रुवराजसिंग गल्ली, गोपाळ गल्ली, जीवनदया गल्ली, गिगावडी, भीमनगर, भीमनगर, लोवरनगर, सी. परिसर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट रोड, N.S.S. रोड, महिंद्रा पार्क, डी.एस. पथ.

एल विभाग
कुर्ला: नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नेहरू नगर (कुर्ला पूर्व), मदर डेअरी रोड, कसाईवाडा, चुनाभट्टी परिसर, राहुल नगर, एव्हरर्ड नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, एसजी बर्वे मार्ग, केदार नाथ मंदिर, पोलिस नगर रोड, कर्नल नगर, हंगणनगर रोड साबळे नगर, संतोषी माता नगर.

एफ- उत्तर विभाग
दादर (पूर्व), माटुंगा (पूर्व), वडाळा, चुनाभट्टी परिसर, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्माडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, लोढा बिल्डिंग्ज (न्यू कफ परेड), सायन कोळीवाडा-सरदार नगर, संजय गांधी नगर, के.डी. गायकवाड नगर, कोरबी मिठागर.

एफ- दक्षिण विभाग
केईएम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, शिवडी (पूर्व) क्षेत्र – शिवडी किल्ला रोड, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा, शिवडी (पश्चिम) क्षेत्र – आचार्य दोंडी मार्ग, टी.जे. मार्ग, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेड मार्ग, गोलंजी इनपुट, परळ गाव पंप झोन - जीडी आंबेडकर मार्ग (५० फ्लॅट्सपर्यंत), एकनाथ घाडी मार्ग परळ गाव रोड, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग विजयकुमार वळिंबे मार्ग, एस.पी. कंपाउंड (आंशिक), काळेवाडी झोन, परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (आंशिक), साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकडी, नायगाव पंप झोन – जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, जी.डी. आंबेडकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मंडई, भोईवाडा गाव, हाफकिन इन्स्टिट्यूट, दादर, जगन्नाथ भाथणकर मार्ग, बी.जे. देवरुखर मार्ग.

Web Title: Mumbai Water Supply News: Sion, Chembur, Ghatkopar, Kurla Among Areas Facing Water Cuts After 1200 mm Pipeline Burst in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.