Join us

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:24 IST

Mumbai Water Cut News: मुंबईत घाटकोपर पश्चिमेतील नियोजित पायाभूत सुविधांच्या कामांमुळे येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी नागरिकांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल.

मुंबईत घाटकोपर पश्चिमेतील नियोजित पायाभूत सुविधांच्या कामांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या  मुंबईच्या पूर्व उपनगरातील रहिवाशांचा शनिवारपासून (२६ एप्रिल २०२५) २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागांत राहणाऱ्या नागिरकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, एन आणि एल वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या नागरिकांचा शनिवारी सकाळी १०.०० वाजता पाणीपुरवठा बंद केला जाईल. त्यानंतर २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.

एल विभाग, कुर्ला (पश्चिम) येथे पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २७ एप्रिल सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. याशिवाय, घाटकोपर (पश्चिम) परिसरातील पाणीपुरवठा शनिवारी (२६ एप्रिल २०२५) सकाळी १० वाजेपासून ते रविवार (२७ एप्रिल २०२५) सकाळी १० वाजेपर्यंत खंडित राहील. मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वेळेत पाण्याचा साठा करून पाणी काटकसरीने वापरावे. 

'या' भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

एन विभाग: भटवाडी, बर्वेनगर, काजुटेकडी, रामजी नगर, सोनिया गांधी नगर, राम नगर पाणी टाकी परिसर, रायगड विभाग, विक्रोळी पार्क साईट (भाग), शिवाजी नगर, अमृत नगर, जगदूष नगर, गोळीबार रोड, सेवानगर, ओएनजीसी कॉलनी आणि महानगरपालिका वसाहती, चाळी आणि निवासी सोसायट्यांमध्ये पसरलेल्या ५० हून अधिक परिसर.

एल विभाग: एनएसएस रोड, नारायण नगर, संजय नगर, समता नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, संघर्ष नगर आणि मोहिली आणि भानुशाली वाडीचा काही भाग आणि इतर परिसर.

 

टॅग्स :मुंबईपाणीकपातकुर्लामुंबई महानगरपालिका