Mumbai University: मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 10:30 IST2026-02-02T10:29:10+5:302026-02-02T10:30:10+5:30
Mumbai University Exam Postpones: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने ९ आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai University: मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा जाहीर!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकळल्या आहेत. त्या अनुक्रमे २४ फेब्रुवारी आणि २५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत.
५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने आधी ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी नियोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यापूर्वी महापालिका निवडणुकांमुळे १४ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षाही विद्यापीठाला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.
त्या परीक्षा ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केल्यावर विद्यापीठाने आधी नियोजित केलेल्या ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा १७, १८ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी होणार आहेत. विद्यापीठाने बुधवारी, २८ जानेवारीला दुपारच्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्या परीक्षा २३ फेब्रुवारीला दुपारी २:३० ते ४:३० दरम्यान घेतल्या जातील.