मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; विविध अभ्यासक्रमांच्या सीईटींमुळे निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:58 IST2025-03-20T12:58:35+5:302025-03-20T12:58:48+5:30

...मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यापीठाने आठ दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यांचे सुधारित वेळापत्रकही जारी केले आहे. 

Mumbai University postpones exams; decision due to CET of various courses | मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; विविध अभ्यासक्रमांच्या सीईटींमुळे निर्णय 

मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; विविध अभ्यासक्रमांच्या सीईटींमुळे निर्णय 

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या एमबीए, एमएमएस, बी. एड., बी. पी. एड. आणि हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या दिवशीच मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यापीठाने आठ दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यांचे सुधारित वेळापत्रकही जारी केले आहे. 

सीईटी सेलने यंदा १९ मार्चपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना सुरुवात केली आहे. त्यानुसार बीएड जनरल अँड स्पेशल अभ्यासक्रमाची सीईटी २४ ते २६ मार्चदरम्यान होणार आहे, तर २७ मार्च आणि २८ मार्चला बीपीएड आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाणार आहे.  

नव्या तारखा कोणत्या?
वाणिज्य आणि मॅनेजमेंट - ५ एप्रिल
वाणिज्य आणि मॅनेजमेंट  - ७ एप्रिल
वाणिज्य आणि मॅनेजमेंट - ८ एप्रिल
कला शाखा सर्व परीक्षा - ५ एप्रिल
टीवाय बीएससी डाटा सायन्स - ४ एप्रिल
वाणिज्य आणि मॅनेजमेंट -  ९ एप्रिल
कला शाखा सर्व परीक्षा  - १९ एप्रिल
वाणिज्य आणि मॅनेजमेंट -  ११ एप्रिल
कला शाखा सर्व परीक्षा - २१ एप्रिल
टीवाय बीएससी कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, आयटी सत्र ६ - ४ एप्रिल
कला शाखा सर्व परीक्षा -  २२ एप्रिल
कला शाखा सर्व परीक्षा  - २३ एप्रिल 
 

Web Title: Mumbai University postpones exams; decision due to CET of various courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.