मुंबई: कांदिवली पश्चिमेतील डहाणूकरवाडी परिसरातील एका नाल्यात मंगळवारी ३५ ते ४० वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. मृताची ओळख पटविण्यासाठी आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आयएनएस वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी परिसरात एका नाल्यात एका ३५-४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. कांदिवली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तपासात मदत करण्यासाठी जवळच्या पोलिस ठाण्यांशी संपर्क साधण्यात आला आहे.