"मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब", वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 09:03 AM2024-02-02T09:03:04+5:302024-02-02T09:18:43+5:30

मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या असून हा फोन कुठून आला आणि तो कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Mumbai Traffic Police Control Room receives a threat message from an unknown person. The message states that bombs have been placed at six locations across Mumbai | "मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब", वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज

"मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब", वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज

मुंबई : मुंबईत बॉम्बस्फोटाच्या धमकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी मेसेज करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. यामुळे मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या असून हा फोन कुठून आला आणि तो कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेसेज आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. तसेच, या मेसेजनंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वीही मुंबई पोलिसांना धमकीचे असे अनेक फोन आले आहेत. याआधी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सुद्धा धमकीचा मेसेज आला होता. गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या वॉट्सअप नंबरवर पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज आला होता. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.  बॉम्ब शोधक पथके देखील पुना हॉस्पिटलमधे तैनात करण्यात आली. धमकीचा हा मेसेज करणाऱ्या व्यक्तिचा पोलीस शोध घेत आहेत. 

Web Title: Mumbai Traffic Police Control Room receives a threat message from an unknown person. The message states that bombs have been placed at six locations across Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.