मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 05:50 IST2025-10-24T05:49:51+5:302025-10-24T05:50:47+5:30
हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती कळू शकलेली नाही.

मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईहून नेवार्कसाठी उड्डाण घेतलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय वैमानिकाला आला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याने विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले. ही घटना बुधवारी घडली.
या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. एअर इंडियाने या प्रवाशांची हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करून दिली. शिवाय, एअर इंडिया तसेच अन्य विमान कंपन्यांमार्फत प्रवाशांची पुढील व्यवस्था करून दिली आहे.
तीन तासांच्या प्रवासानंतर लक्षात आला बिघाड
प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-१९१ या विमानाने मुंबईतून उड्डाण केले. त्यानंतर तीन तासांचा प्रवास केल्यावर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय वैमानिकाला आला. त्यानंतर वैमानिकाने हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवले आणि या विमानाने मुंबईत सुरक्षित लँडिंग केले. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले. हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती कळू शकलेली नाही.